23.1 C
New York

BCCI : सामन्याआधी टॉस होणार नाही? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

Published:

क्रिकेटमध्ये क्षणोक्षणी खेळ बदलत असतो. शेवटचा चेंडू होत नाही, तोवर कोणता संघ विजयी होणार? हे सांगता येत नाही. या वरुन क्रिकेट खेळ किती अनिश्चिचततेचा आहे, याचा अंदाज बांधता येतो. सामन्याआधी होणाऱ्या टॉसमुळे सामन्याचं गणित ठरतं. दोन्ही संघाचे कर्णधार खेळपट्टीनुसार टॉसनंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवतात. टी 20 क्रिकेटमध्ये टॉससोबत बरंच काही ठरतं.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी Apex Council ला देशांतर्गत क्रिकेटच्या २०२४-२५ हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काही बदल सुचवले आहेत. रणजी करंडक स्पर्धेच्या ( २०२३-२४) मागील पर्वातील सामन्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याने सलग सामन्यांमुळे थकवा येत असल्याची नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीवर परिणाम होत असल्याचेही त्याचे म्हणणे होते.

भारतीय संघात होणार मोठा बदल?

BCCI कुणी टॉस जिंकला रे..

क्रिकेट सामन्यात नाणेफेकीचं वेगळंच महत्व आहे. सामना सुरू (Toss Eliminated) होण्याआधी टॉस होता. यानंतर खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज घेऊन प्रतिस्पर्धी संघांचे कर्णधार निर्णय घेत असतात. क्रिकेट चाहतेही आधी टॉसची चर्चा करतात. सामन्याआधी कुणी टॉस जिंकला रे.. असे शब्द कधीतरी तुमच्याही कानी पडले असतील. तर आता टॉसच इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पण, थांबा हा निर्णय आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही तर देशांतर्गत क्रिकेटच्या सामन्यात घेतला जाऊ शकतो. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.

देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्वरुपात काही बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. सीके नायडू ट्रॉफीसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात टॉस रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. या स्पर्धेत पाहुण्या संघाला फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा निर्णय घेण्याची मुभा राहिल. हा प्रस्ताव बीसीसीआयचे सचिव जय शाह, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य कोच राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातील चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे.

BCCI आयपीलमध्येही टॉस होणार नाही?

क्रिकेटमधील काही जाचक नियमांमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिग्गजांसह क्रिकेट चाहत्यांचीही आहे. अनेक आजी-माजी दिग्गज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियमांमध्ये बदल व्हावेत, यासाठी आग्रही असतात. आता जय शाह यांच्या प्रस्तावानंतर सी के नायडू अंडर 23 स्पर्धेतून टॉसचा हटवण्याचा निर्णय घेतला गेला, तर तो ऐतिहासिक ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img