21 C
New York

Manoj Jarange : माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव- जरांगे

Published:

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे Manoj Jarange पाटील यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना ते म्हणाले की, मराठा हा कधीच जातीयवादी नव्हता. मराठा समाज जातीयवादी असता तर या महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, वसंतराव नाईक, मनोहर जोशी कधी मुख्यंमत्री होऊ शकले नसते. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होऊ शकले नसते. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते. मराठा समाज हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. मराठा समाजानेच तुम्हाला राजसत्तेवर बसवले. पण त्याच राजसत्तेवरून बसून गृहखात्याचा तुम्ही गैरवापर केला. मराठ्यांच्या मुलांवर केसेस केल्या, एसआयटी नेमून त्रास दिला. माझ्या कुटुंबियांवरही हल्ले करण्याचा डाव आखण्यात आला. ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही.माझा प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

पंकजा मुंडेंनी सांगता सभेत का वापरला उदयनराजेंचा एक्का ?

Manoj Jarange गृहमंत्री फडणवीस हुकूमशहा

“गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे. कारण मी त्यांचे ऐकत नाही. ते हुकूमशहा आहेत. त्यांना वाटतं ते म्हणतील तसंच व्हावं, नाहीतर ते तुरुंगात टाकतील. मी मागेही याबाबत बोललो होतो. माझ्याविरोधात एसआयटी स्थापन करणे, खोटे व्हिडीओ बनवणे, माझ्याविरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसविणे, त्यांच्याकरवी आरोप करायला लावणे, असले प्रयोग करून झाले आहेत”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. कुटुंबावर हल्ला होणार हे कसं समजलं तुम्हाला ? असा सवाल करत असता जरांगे पाटील यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगू शकत नाही. पण ही माहिती देणारे गृहमंत्र्यांच्याच आजूबाजूचे आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img