8.5 C
New York

Jarange Patil : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Published:

जालना

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक होत आहे. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या बांधवांना हाक दिली आहे. निवडणुकानंतर विराट सभा घेण्यात येणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपातील (BJP) नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या निवडणूक होणार आहे त्यामध्ये मनोज रंगे पाटील यांच्या बालेकिल्ला असलेल्या जालना औरंगाबाद आणि बीडमध्ये उद्या निवडणूक पार पडत आहे या पूर्वसंध्येला मनोज जरांगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं? त्यांना काय कळतं. फक्त तेरे नाम भांग पाडून फिरत असतात, स्वतःची 37 मतं तरी त्यांना पडतात का? असे मनोज जरांगे पाटील म्हटले.

मनोज जरांगे म्हणाले की, 8 जून रोजी नारायण गड येथे भव्य सभा घेतोय, 15 मे रोजी येथील जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर, राज्यभरातील सर्वच मराठा बांधवांना येथील सभेसाठी आवाहन करण्यात येत असून 6 कोटी मराठा बांधव याठिकाणी येणार आहेत. 15 तारखेच्या पाहणीनंतर सभेबाबतचा अंतिम निर्णय मी घेणार असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, पंकजा मुंडे यांना पाडा असं मी कुठेच बोललो नाही. उलट त्या जातीयवादी राजकारण करत आहेत. भरसभेत त्या म्हणतात आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. त्याचवेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणे गरजेचे होतं. मात्र, त्यांनी आक्षेप घेतला नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img