21 C
New York

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

Published:

राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम (Lok Sabha Election) सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या शा‍ब्दिक युद्धाला आता धार चढली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत सामना आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला.

Devendra Fadnavis बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे

फडणवीस पुढे म्हणाले, भाजपला सोडून ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जातील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. २०१९ मध्ये मात्र त्यांनी वेगळी आघाडी केली. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतील यावर आमचा विश्वास होता पण यात आमची चूक झाली. निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे वैयक्तिक टीका करतात त्याची कीव करावीशी वाटते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून काही गोष्टी आम्हाला दिसत असतानाही आम्ही त्यावर काही बोलत नसायचो. बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या विश्वासामुळे आम्ही असा व्यवहार करत होतो.

पंकजा मुंडेंनी सांगता सभेत का वापरला उदयनराजेंचा एक्का ?

Devendra Fadnavis १९९९ मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं.

तसं पाहिलं तर आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रि‍पदाची स्वप्नं पडू लागली होती. १९९९ मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केलं. आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जातील. पण २०१९ मध्ये त्यांनी वेगळी आघाडी तयार केली. मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही वैचारिक निष्ठेला सर्वाधिक महत्व देतो. पण आमची चूक झाली असे फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. राज्यात युतीचं सरकार आल्यानंतरही या सरकारचा मुख्यमंत्री मी झालो नाही. मी लगेच विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात माझा महत्वाचा सहभाग होता. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी हे केलं असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img