8.3 C
New York

Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले…

Published:

मी यापुढे निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढण्याची इच्छा नाही. माझा विधानपरिषदेचा कार्यकाळ अजून बाकी आहे, अशी मोठी घोषणा आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी केली. मी अजून पाच वर्षांसाठी विधानपरिषदेचा आमदार आहे. मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकारणातील व्यक्ती आहे सध्या मात्र माझा निवडणूक लढण्याकडे कल नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश अनेक दिवसांपासून रखडला आहे. यांसह अन्य राजकीय मुद्द्यांवर आज त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केले.

Eknath Khadse पण, आता मी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही

शरद पवारांनी मला सांगितलंय की एकदा दिलेली वस्तू आम्ही परत घेत नाही. आता त्यांच्याकडूनच मला अभय मिळालं आहे म्हटल्यानंतर बाकी जर कुणी माझ्या राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी काही देणंघणं नाही. मी एक राजकीय व्यक्ती आहे. मी अजून तरी राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेली नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. पण, आता मी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही

‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड’ – राऊत

Eknath Khadse रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं काम करतील. मी भाजपचं काम करेन

शरद पवार गट सोडताना एकनाथ खडसेंनी मला मुलगी म्हणून सोबत येण्याबद्दल विचारणा केली, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केले. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप मध्ये येताना मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नाकारले आणि शरद पवार यांच्या सोबत राहील असे सांगितले. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे, तिला तिथे भविष्य दिसतेय, म्हणून ती राष्ट्रवादी शरद पवार गटात राहील. रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं काम करतील. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे काम करणार, असे त्यांनी म्हटले.

जेव्हा एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा त्यांनी मुलगी म्हणून काळजीपोटी मला सोबत येण्याबद्दल विचारणा केली होती. तेव्हा मी त्यांना मी तुमच्या सोबत येणार नाही. मी शरद पवार यांच्या नेतृत्वामध्येच काम करेल, सोबत भाजपमध्ये येऊ शकत नाही, असे सांगितले आणि त्यानंतर आम्ही दोघांमध्ये चर्चा झाली नाही. त्यांनी मला राजकीय निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य दिले असल्याचेही रोहिणी खडसे म्हणल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img