23.1 C
New York

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड’ – राऊत

Published:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या सभांचा धडाका लावला आहे. नाशिकमधल्या फेऱ्याही त्यांच्या वाढल्या आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी जोरदार टिका केली आहे. शिंदे हे नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी येत असावेत. त्यांनी धनुष्य-बाण चोरला आहे. त्यांची सध्या धावपळ सुरू आहे. पण ही त्यांची अखेरची फडफड असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं.

Sanjay Raut ‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड’

राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शिंदे, अजितदादा आणि फडणवीसांनी टेम्पो भरून जरी पैसे वाटले तरी काही होणार नाही. लोक त्यांना मतदार करणार नाहीत. मोदींनीही महाराष्ट्रात ठाण मांडले होते. पण त्याचाही काही परिणाम होणार नाही. मविआ राज्यात 35 जागा जिंकणार आहे असा दावा यावेळी राऊत यांनी केला. शिवाय मुख्यमंत्र्यांची सध्या धावपळ सुरू आहे. ही धावपळ सुरू नसून अखेरची फडफड सुरू असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्याकडे आता डॅमेज कंट्रोलसाठी काही राहीले नाही असेही त्यांनी सांगितले.

… आता शाप अनुभवा’; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात

Sanjay Raut फडणवीसांना दिली नवी उपमा

1999 पासूनच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचं होतं असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शिवाय नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरेंनीच प्रयत्न केले होते असंही फडणवीस बोलले होते. त्यावर बोलताना राऊत यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. फडणवीसांना जास्त गांभीर्याने घेऊ नका असे ते म्हणाले. ते राजकारणातले कच्चे मडके आहेत अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे. राणेंना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले होते. आणि राणेंच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका हरलो होतो हे फडणवीसांना माहित नसावे असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Raut राज ठाकरेंनाही टोला

राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत आता हिंदूंनी भाजपला मतदार करण्यासाठी फतवा काढा असे आवाहन केले होते. त्याचाही समाचार राऊत यांनी घेतला. ते कसले फतवा काढत आहेत. लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा, हा आता आम्ही फतवा काढतो असे ते म्हणाले. शिवाय राज यांना काही कळतं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान 15 तारखेला उध्दव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये होणार आहे. अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img