काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या चर्चेच्या आव्हानानंतर भाजपा काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल, शनिवारी दोन माजी न्यायाधीश आणि एका ज्येष्ठ पत्रकाराच्या पत्राला औपचारिक उत्तर दिले. राहुल म्हणाले की, त्यांना किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना चर्चेत सहभागी होण्यास खूप आनंद होईल. माजी न्यायमूर्तींच्या पत्राला पोहोच देत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींशी वादविवाद करण्याची जाहीर तयारी दर्शवली आहे. शिवाय पीएम मोदी यासाठी तयार होतात का? केव्हा तयार होतात ते कळवा, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Rahul Gandhi मोदींनी होकार दिल्यास चर्चेचं स्वरुप ठरवू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर चर्चेस आव्हान स्वीकारल्यास आपण चर्चेचं स्वरुप ठरवूयात. मी किंवा आमचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी कोणीही चर्चेला येऊ, असा निरोप राहुल गांधी यांनी पाठवला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावाला प्रतिसाद मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाजपा नेते तेजस्वी सूर्या म्हणाले की , राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, INDIA आघाडीची चर्चा तर सोडाच. आधी त्यांनी स्वत:ला काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे, त्यांच्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणार असे सांगावे आणि नंतर पंतप्रधानांना चर्चेसाठी बोलावावे. सुर्या पुढे म्हणाले की, तोपर्यंत आम्ही आमच्या बीजेवायएमचे प्रवक्ते कोणत्याही वादविवादात त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तैनात करण्यास तयार आहोत.
उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
Rahul Gandhi अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या धर्तीवर प्रस्ताव
माजी न्यायमूर्ती मदन लोकुर,अजित शाहा व पत्रकार एन राम यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये जाहीर चर्चा केली जाते. त्याच धर्तीवर भारतात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन नेत्यांची जाहीर डिबेट आयोजित करण्याचा
माजी न्यायमूर्तींचा मानस आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आव्हान स्वीकारलं, पण नरेंद्र मोदी या चर्चेसाठी कधी तयार होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Rahul Gandhi काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले आहे की, निरोगी लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी एका व्यासपीठावरून देशासमोर त्यांचे व्हिजन मांडणे हा सकारात्मक उपक्रम असेल. काँग्रेस या उपक्रमाचे स्वागत करते आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारते. पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी व्हावे, अशी देशाची अपेक्षा आहे.