3.8 C
New York

Ahmednagar : अहमदनगरमध्ये दोन गटात राडा

Published:

अहमदनगर

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान उद्याला पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावले आहे. अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला अहमदनगर (Ahmednagar) मध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून (Ahmednagar Police) परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्याला मतदान पार पडणार आहे. मात्र दुसरीकडे आज अहमदनगर शहरात जुन्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. राडाची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या राडांमध्ये वाहना आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते यांच्यात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या राड्यात दगडफेकीदरम्यान, सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फोडण्यात आले, तर एका वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही गटाच्या राड्यात वाहनाच्या समोरील आणि पाठिमागील काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गटात झालेल्या राड्यामुळे शहरातील मंगलगेट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार असल्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र आता तणावाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img