शनिवारी सकाळी सांगोला ते जत (Sangola Accident) या मार्गावरील सोनंद गावाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर जागीच ठार झाल्या आहेत. तसेच या अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाले असून ही घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली. दरम्यान, आज सकाळी बेळगांव जिल्ह्यातील अथणी येथील चौदा महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्ष बागेत काम करण्यासाठी जात होत्या. जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने जीप अचानक पलटी झाली.
मतदानाच्या पूर्वसंध्येला बँक सुरु ठेवणं पडलं महागात
Sangola Accident या घटनेत नऊ महिला जखमी
जीप अचानक पलटी झाल्यामुळे जीप मधील प्रवास करत असणाऱ्या महिला बाहेर फेकल्या गेल्या. त्यामुळे तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलविले आहे. मृत व जखमी महिला या बेळगांव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोग्री व ममलाद या दोन गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगोला तालुका पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली.