19.7 C
New York

Loksabha Election : निवडणुकीच्या अनुषंगाने ओतूर पोलिसांचा रूट मार्च 

Published:

ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी,ओतूर पोलिसांकडून शनिवारी दि.११ रोजी ओतूर शहरात रूट मार्च काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ओतूर शहरात आणि पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून,नागरिकांनी निर्भयपणे मतदान  करण्यासाठी पोलीसांनी शनिवारी दि.११ रोजी ‘रूट मार्चचे आयोजन केले होते.नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी नागरिकांना केले आहे.

सांगोल्यात जीपचा भीषण अपघात, तीन महिला जागीच ठार

सदर रूट मार्च चे आधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ताच्या अनुषंगाने सुचना देण्यात आल्या.  हा रूट मार्च हा ओतूर पोलीस स्टेशन येथुन सुरू करून मेन बाजरपेठेतून,एसटी स्टँंड मार्गे, ब्राम्हणवाडा रोडने,जुनी धान्य बाजारपेठेतुन,पांढरी मारूती मंदीर मार्गे,खोचारा,सराफआळी मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन कडे नेण्यात आला. रूट मार्चमध्ये ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर,पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह एकूण ८१ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img