21 C
New York

PM Narendra Modi: सत्य स्वीकारा, अपप्रचारातून बाहेर या!

Published:

नवी दिल्ली: भारतात अल्पसंख्याक मुस्लिमांची (Muslim) दडपशाही सुरू आहे. त्यांचा आवाज दाबला जात आहे, असा खोटा प्रचार आर्थिक सल्लागार समितीच्या (EAC-PM) आकडेवारीने उघडा पाडला आहे. 1950 ते 2015 या काळात भारतातील हिंदूंची (Hindu) संख्या सुमारे 8 टक्क्यांनी कमी झाली आहे, तर अल्पसंख्याकांची संख्या 43 टक्क्यांनी वाढली आहे. ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना म्हटले आहे.

भारतात अल्पसंख्याकांना धोका आहे अशी जगभर खोटी कल्पना निर्माण केली जात आहे. मुळात ही धारणाच चुकीची आहे. कृपया सत्य स्वीकारा आणि अप्रचारातून बाहेर या, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, वसुधैव कुटुंबकम या भावनेवर चालणारा देश आहे. याचीच प्रचिती नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीतून मिळते. 1950 ते 2015 या काळात भारतातील बहुसंख्य हिंदू लोकसंख्येचा वाटा 7.82 (84.68 टक्क्यांवरून 78.06 टक्क्यांवर) घसरला, तर मुस्लिमांचा टक्का तब्बल 43 टक्क्यांनी वाढला आहे. 1950 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 9.84 टक्के होती, 2015 मध्ये त्यात वाढ होऊन 14.09 टक्के झाली आहे. या अहवालानुसार, 1950 ते 2015 दरम्यान ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा 2.24 टक्क्यांवरून 2.36 टक्क्यापर्यंत म्हणजे 5.38 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

राज्य सरकारच्या या मंडळाविरोधात काँग्रेसची आयोगात तक्रार

शीख लोकसंख्येचा वाटा 1950 मध्ये असलेला 1.24 टक्क्यांवरून 2015 मध्ये 1.85 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यांच्या वाट्यामध्ये 6.58 टक्क्यांनी वाढ झाली. बौद्ध लोकसंख्येचा वाटा देखील 1950 मध्ये 0.05 होता. त्यात 0.81 टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे, भारताच्या लोकसंख्येतील जैनांचा वाटा 1950 मध्ये 0.45 टक्क्यांवरून 2015 मध्ये 0.36 टक्क्यांवर घसरला. भारतामध्ये पारशी लोकसंख्येच्या वाट्यामध्ये 85 टक्क्यांनी मोठी घट झाली असल्याचे हा अहवाल सांगतो, त्यामुळे मुस्लिमांविषयी जगभर भारताचे निर्माण करण्यात येणारे चित्र चुकीचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

आपल्याला भारताला पुढे न्यायचे आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा माझा मंत्र आहे. तो मी कसोशीने पाळत आहे. सरकारने केलेल्या कामात जात, लिंग किंवा धर्माच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये ही माझी भूमिका आहे, असे सांगतानाच धर्माच्या आधारावर आरक्षण देणे सर्वात धोकादायक गोष्ट आहे. कोणताही देश अशा प्रकारे चालवता येणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img