19.7 C
New York

Naxal Encounter : 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

Published:

रायपूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना (Naxal Encounter) ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. पिडिया गावाजवळील जंगलात सुरक्षा दलाचे पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यावेळी सुरक्षा जवानांनी या परिसराची नाकाबंदी करत 12 नक्षलींचा खात्मा केला.

या विषयी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी माहिती देताना सांगितले की, विजापूर जिल्ह्यातील गंगलूर भागात नक्षलवाद्यांशी चकमक झाली.नक्षलवाद्यांचे 12 मृतदेह सापडले आहेत. सुरक्षा कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे. या परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी 16 एप्रिल रोजी राज्याच्या कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

गेल्या काही महिन्यांत नक्षलवाद्यांच्या कारवाईत लक्षणीय वाढ झाली आहे. चकमकीत अनेकांना ठार मारण्यात आले आहे, तर सुरक्षा दलांच्या पुनर्वसन कार्यक्रमांनी प्रेरित होऊन मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांच्या ‘पुना नरकोम’ पुनर्वसन कार्यक्रमातून प्रेरणा घेत नक्षलवादी पोलिसांच्या स्वाधीन होत आहेत. पुना नरकोम हा स्थानिक गोंडी बोलीतील एक वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ “नवीन पहाट” असा आहे. 29 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी अनुक्रमे इतर 23 आणि 26 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img