7.8 C
New York

Loksabha Election : प्रचारसभांच्या रणधुमाळीत मोदींचा पहिला नंबर

Published:

देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवट दिवस आहे. प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात सर्वच दिग्गज नेतेमंडळी (Loksabha Election) तळ ठोकून आहे. देशभरातील विविध राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशपातळीवरील नेतेही त्यामुळे,जोरदार प्रचारसभांचे दौरे कर आहेत. आपण जर पहिल्या तीन टप्प्यातील प्रचारसभांची आकडेवारी पहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात जास्त सभा घेऊन रेकॉर्ड केला आहे. पहिल्या 3 टप्प्यात मोदींनी तब्बल 83 सभा घेतल्या आहेत. त्यामुळे, प्रचारसभांच्या रणधुमाळीत मोदींचा पहिला नंबर लागतो.

प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शाह यांनी 66 सभा आणि रोड शो केले आहेत. या काळात पंतप्रधान मोदींनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 निवडणूक सभा आणि ‘रोड शो’मध्ये भाग घेतला आहे, याबाबत भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, मोदींच्या तुलनेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी 29 प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे.

… तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील – केजरीवाल

Loksabha Election 14 मे रोजी मोदींचा उमेदवारी अर्ज

निवडणूक प्रचारात 31 मार्च ते 5 मे या तीन टप्प्यांतील सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. 83 निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. दरम्यान, 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी १३ मे रोजी त्यांच्या विशाल ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे.

Loksabha Election शिंदे-पवार वाराणसीला जाणार

सर्व नेते वाराणसीत येणार मोदी यांच्या उमेदवारीसाठी 25 ते 30 समर्थकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध जाती, जमातींचे लोक आहेत. मोदी हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून यांना समर्थक बनवून सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळत आहे, असा संदेश दिला जाणार आहे. एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान वाराणसीला पोहोचणार आहेत.
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही वाराणसीला जाणार आहेत.

Loksabha Election लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रचारसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 83
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 66
काँग्रेस नेते राहुल गांधी 40
प्रियांका गांधी 29

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img