21 C
New York

Ajit Pawar : काकांप्रमाणे दादांची देखील भर पावसात सभा

Published:

चाकण

शरद पवार यांनी २०१९ साली सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एक जाहीर सभा घेतली होती. पावसाला शरद पवार भाषण करत असतानाच सुरुवात झाली. मात्र शरद पवार यांनी न थांबता आपले भाषण पूर्ण केले होते. या सभेची चर्चा देशभर झाली. त्यानंतर भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पोटनिवडणुकीत मोठा पराभव झाला. आताही असाच एक प्रकार घडला आहे. पण आता पावसात शरद पवार यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar) आहेत. चाकण येथे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सांगता सभेत जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी मंचावर बसलेले अजित पवार अजिबात उठले नाहीत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जून २०२३ साली शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी ४० आमदारांच्या गटासह एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीत दोन गट पडले. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तर शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ असे नाव देण्यात आले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ दोन्ही गटांसाठी बारामती इतकाच महत्त्वाचा आहे. याठिकाणी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर अजित पवार गटाकडून उभे आहेत.

धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर हल्ला, म्हणाले..

Ajit Pawar माझी चूक दुरुस्त करा – अजित पवार

आपण शेतकऱ्याची औलाद असल्यामुळे आपल्याला पाऊस हवाच आहे. पाऊस आल्यानंतरच आपली पेरणी होती. त्यामुळे पावसात सभा घेण्यासारखा दुसरा आनंद नाही, अशी भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच भाषणात बोलत असताना २०१९ साली आपण डॉ. अमोल कोल्हे यांना तिकीट देऊन चूक केली असल्याचे सांगितले. माझ्या चुकीची भरपाई यावेळी करायची असून शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img