देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) धुमाकूळ पाहायला मिळत आहे. देशात जिकडे तिकडे इलेक्शन पाहायला मिळतंय. प्रत्येक राज्यातील आमदार असो व खासदार पक्ष प्रचार करण्यास व्यस्त आहेत. मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्या गटातून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) निवडणूक लढवत आहेत. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत बॉम्बस्फोटामधला आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा आणि तो कीर्तिकरांबरोबर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. आणि ह्याच प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने उपरोधिक पोस्ट केली आहे.
नुकतीच केतकी चितळेने (Ketaki Chitale ) इंस्टाग्रामवर (Instagram) एक उपरोधिक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये केतकीने ठाकरे आणि कीर्तिकर यांचा उल्लेख केलाय.
“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव,” असं स्टोरी मध्ये केतकी चितळेने लिहिल आहे. त्यातच आता केतकीच्या ह्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या चर्चेला उधाण आलंय.
कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पूर्णविराम! नेमकं घडलं काय?
नेमकं प्रकरण काय?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा (Iqbal Musa) सहभागी झाला होता आणि तो कीर्तिकरांसोबत आहे, असा आरोप गुरुवारी भाजपने केला. भाजपचे आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी प्रचारयात्रेत कीर्तिकर यांच्याजवळ इक्बाल मुसा असल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते.
(Amol Kirtikar) अमोल किर्तीकरांनी फेटाळले आरोप
अशातच, भाजपने केलेले हे आरोप कीर्तिकर यांनी फेटाळले आहेत. प्रचारयात्रेत ४००-५०० लोक येतात, जवळ येऊन स्वत:ची ओळख करून देतात. त्यातील सगळ्यांना उमेदवार ओळखत नसतात. जरी इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तर मग तो बाहेर कसा? असा प्रश्न ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये यांनी उपस्थित केला होता.