23.1 C
New York

KCR Claims : प्रादेशिक पक्षांचा गट केंद्रात सरकार बनवेल

Published:

हैदराबाद: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रादेशिक पक्षांचा एक गट केंद्रात सरकार स्थापन करू शकतो, त्याला एनडीए (NDA) किंवा इंडिया (INDIA) आघाडीला पाठिंबा द्यावा लागेल, असा आश्चर्यकारक दावा भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव – K Chandrashekhar Rao (KCR Claims) यांनी केला आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या एका विस्तृत मुलाखतीत के चंद्रशेखर राव (KCR) म्हणाले की, तेलंगणातील लोकसभेच्या 17 मतदारसंघांपैकी त्यांच्या पक्षाला दुहेरी अंकात विजय मिळालेला असेल. विद्यमान खासदार आणि लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाचे उमेदवार नामा नागेश्वर राव यांच्या रॅलीला संबोधित करताना नागेश्वर राव केंद्रीय मंत्री होऊ शकतात, असा भाषणात म्हणले होते. तोच धागा पकडून त्यांना या बद्दल विचारण्यात आले की एनडीए किंवा इंडिया आघाडीला तुमचा पक्ष पाठिंबा देणार का? त्यावर केसीआर म्हणाले की, मी तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगेन ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. यावेळी देशात काहीतरी नवीन घडणार आहे. सर्व प्रादेशिक पक्ष आता एक शक्ती म्हणून उदयास येतील. एनडीए किंवा इंडिया आघाडीच्या पाठींब्याबरोबर ते सरकार स्थापन करतील.

शिवसेनेसोबत जाण्याने काँग्रेसची वाताहत झाली का?

के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने 2019 मध्ये तेलंगणातील लोकसभेच्या 17 पैकी नऊ जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये स्थापन झालेल्या या राज्यात पक्षाने जवळपास एक दशक राज्य केले. राव सलग 10 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काँग्रेसला मोठा विजय मिळाला. 119 पैकी काँग्रेसने 64 जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवले. यावर राव म्हणाले की, काँग्रेसने सत्तेत राहून सहा महिन्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत आणि लोक रेवंत रेड्डी सरकारवर नाराज आहेत.

महिलांसाठी मोफत बस प्रवास हे एकमेव आश्वासन त्यांनी पाळले आहे. तोही एक मोठा विनोद बनला आहे. महिला बसमध्ये भांडत आहेत आणि ऑटोचालक रस्त्यावर निदर्शने करत आहेत. त्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत. माझ्या कारकिर्दीत खूप आत्मविश्वास मिळालेला शेतकरी वर्गही खूप नाराज आहे आणि त्याचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीत दिसेल, असे राव म्हणाले. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने तेलंगणामध्ये 4 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने एल दावा केला आहे की ते दुहेरी अंकात प्रवेश करतील. या विषयी छेडले असता राव म्हणाले, “भाजप गोबेल्स मोहीम राबवत आहे. या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपला एखाद दुसरी किंवा एकही जागा मिळणार नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img