4 C
New York

PDCC Bank : मतदानाच्या पूर्वसंध्येला बँक सुरु ठेवणं पडलं महागात

Published:

चार दिवसांपूर्वी देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा होता. बारामती लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री (दि.6) पहाटेपर्यंत बॅंक उघडी ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC Bank) वेल्हा शाखेचे मॅनेजरचे निलंबन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.7) रात्री उशिरापर्यंत बँक चालू होती. नियमांच्या पुढे उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याने आचारसंहिता भंग केल्याचा ठपका बँक व्यवस्थापकावर ठेवण्यात आला होता. याबाबत आमदार रोहित पवारांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. (PDCC Velhe Branch Bank Manager Suspended)

PDCC Bank रोहित पवारांनी केले आरोप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री उघडी ठेवण्यात आल्याची माहिती आणि त्याबद्दलचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करत त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आज पुणे, बारामती माढा या लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. त्या पार्श्वभूमीवर या बँकवर शंका उपस्थित केली जात आहे. तसंच, पैशांचा वापर झाल्याचा थेट आरोपही काही ठिकाणी केला जात असल्याचे रोहित पवारांनी म्हटले होते.

भाजप लोकशाहीसाठी संकट, शरद पवारांची टीका

PDCC Bank आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

या घटनेतील सीसीटीव्ही निवडणूक भरारी पथकाने तपासले होते. ज्यात सुमारे 40 ते 50 लोक संशयितरीत्या फिरत असल्याचं दिसत आहे. या घटनेची दखल घेत बँक मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर करत त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानुसार भरारी पथकाने माहिती घेऊन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता PDCC वेल्हे शाखेचे मॅनेजर विनायक ज्ञानोबा तेलवडे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

PDCC Bank झालेली कारवाई धूळफेक

PDCC बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे… मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे… तसंच त्या रात्रीचं CCTV फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे. बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img