19.7 C
New York

Revanth Reddy : सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेसची पुन्हा शंका

Published:

हैदराबाद

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेसने पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. असे काही घडले आहे की नाही हे कोणालाही माहिती नाही, असे काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी म्हटले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून काँग्रेस या निमित्ताने मोदी सरकारवर नव्हे तर भारतीय सैन्य दलांवर अविश्वास दाखवत आहे, असे म्हणत नेटकऱ्यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

Revanth Reddy इंटेलिजन्स नेटवर्क काय करत होते?

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यांनी पुलवामा घटनेबद्दल इंटेलिजेंस ब्युरो (IB) च्या अपयशावर खापर फोडले. या अतिरेक्यांच्या या हल्ल्यात 40 हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मोदींसाठी सर्व काही राजकारण आहे, सर्व काही निवडणुका जिंकण्यासाठी आहे. त्यामुळे मोदींची विचारसरणी देशासाठी योग्य नाही. त्यामुळे देशाला आता मोदी आणि भाजपशिवाय दुसरा पर्यायदेण्याची गरज आहे. ते प्रत्येक गोष्टीला ‘जय श्री राम’ म्हणत उत्तर देतात. पुलवामा ही घटना याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ते अपयशी ठरले आहेत. आयबी काय करत होती? इंटेलिजन्स नेटवर्क काय करत होते? असा सवाल करत मोदीजींनी पुलवामा घटनेनंतर सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असे रेड्डी म्हणाले.

काकांप्रमाणे दादांची देखील भर पावसात सभा

Revanth Reddy पाकिस्तानला क्लीन चिट का ?

रेवंत रेड्डी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, भाजप नेते संजय कुमार म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लीन चिट का देण्याचा प्रयत्न करत आहेत.

संजय कुमार म्हणाले की, दुसऱ्या दिवशी अशा प्रतिक्रियांना पाकिस्तानच्या वर्तमानपत्रातून प्रशंसा मिळते. आज रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न केला. हैदराबादमधील गोकुळ गप्पा, मक्का मशीद, दिलशुकनगर, लुंबिनी पार्क बॉम्बस्फोटांना जबाबदार असलेली ही काँग्रेस सुरक्षेबद्दल बोलण्यासाठी शेवटची ठरली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. उद्या काँग्रेस असेही म्हणेल की हे स्फोट झालेच नाहीत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्वस्त राजकीय प्रसिद्धीसाठी भारतीय सैन्याच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, अशी टीकाही संजय कुमार यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img