18.8 C
New York

Lok Sabha Elections : ठाकरे गटाच्या आणि महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा

Published:

छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोमवारी 13 मे ला या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज शनिवारी (ता. 11 मे) प्रचाराची तोफ थंडावणार आहे. छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात ठाकरे गटाचे सैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी जोरदार राडा झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे कार्यकर्त्यांनी पाहून त्यांना नोटा दाखवल्या. शिवाय घ्या सुपारी म्हणत मनसैनिकांची खिल्ली उडवली. यानंतर मनसैनिकांनीही नोटा आणि दारूच्या बाटल्या दाखवल्या. त्यानंतर एकच राडा झाला. हातात असलेल्या झेंड्यांच्या दांड्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे गोंधळ उडाला. क्रांती चौकातली वाहतूकही ठप्प झाली.

Lok Sabha Elections ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने

छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रचारचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारां पर्यंत पोहचण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली होती. ही रॅली क्रींती चौकात आली. त्याच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. मनसेचे कार्यकर्ते समोर दिसल्यानंतर अंबादास दानवे यांनी त्यांना पैशांच्या नोटा दाखवल्या. त्यामुळे वातावरण तापलं. यावेळी हे लोक पैसे देऊन आणल्याचा आरोप दानवे यांनी सांगत होते. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते भडकले.

चौथ्या टप्प्यात पाहायला मिळणार दिग्ज्यांमध्ये घमासान

Lok Sabha Elections दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

छत्रपती संभाजीनगरात शनिवारी (ता. 11 मे) सकाळी 10 वाजता चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी काढण्यात येणार होती. शहरातील प्रमुख ठिकाण असलेल्या क्रांती चौकातून ही प्रचार फेरी निघणार होती. परंतु, या प्रचार फेरीला उशीर झाल्याने त्या ठिकाणी काही वेळानंतर महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे कार्यकर्ते जमू लागले. पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोणषा देण्यास सुरुवात केली. पण यावेळी तिथे मनसेचे कार्यकर्तेही असल्याने “उठ दुपारी, घे सुपारी…, मनसे आणि दोनशे” अशा प्रकारच्या घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. ज्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Lok Sabha Elections जय श्रीराम म्हणण्याची हिम्मत आहे का?

परंतु, क्रांती चौकात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना त्या ठिकाणी पोलिसांची फौज नव्हती, ज्यामुळे अधिक तणावाचे वातावरण निर्माण झाले, असे सांगण्यात आले. पण काही वेळानंतर या ठिकाणी पोलिसांनी येत परिस्थिती नियंत्रणाात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते होऊ शकले नाही. तर ज्या लोकांनी राम मंदिरावर टीका केली, त्या धर्माध लोकांना घेऊन रॅली काढली जात आहे. जय श्रीराम म्हणण्याची हिम्मत आहे का? असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्षांनी उपस्थित केला. यावेळी या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आयस्क्रीमचे कोन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी दाखवण्यात आले. तर त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही दारुची बाटली दाखवून महायुतीच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे या ठिकाणचे वातावरण आणखीणच तापल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img