दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची (Bhendwal Ghat Mandani) आतुरतेने वाट पाहतात. याच भेंडवळची पावसाबाबत आणि शेतीबाबतचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी (Farmer) चांगले जाणार आहे. भेंडवळ घट मांडणीची परंपरा मागच्या 300 वर्षांपासून सुरु आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते. आज जाहीर करण्यात आलेल्या भाकितातून पिकं चांगली असणार आहेत.
Bhendwal Ghat Mandani भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
350 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकऱ्यांनी असा दावा केला आहे की ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते. शेतकऱ्यांमध्ये या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचं निरीक्षण करुन यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.
Bhendwal Ghat Mandani चांगला पाऊस, हिरवगार सपान
भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. पावसाची सुरुवात अडखळत असली तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस असेल. यंदा आबादाणी आहे. पिकं जोमात असतील. यंदा रान हिरवगार असेल. रोगराईचा प्रादूर्भाव कमी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतामध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या कमी ?
Bhendwal Ghat Mandani राजा असेल कायम
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. चौथ्या टप्प्याकडे निवडणुका वळल्या आहेत. तीन टप्प्यात कमी मतदानाने चिंता वाढलेली आहे. इतकंच नाही तर देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, कोण पंतप्रधान होणार, जनता कुणाच्या पारड्यात मताचा कौल टाकणार याविषयी देखील कमालीची उत्सुकता आहे. भेंडवळच्या भाकितानुसार, देशातील राजा कायम असेल. तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल. शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Bhendwal Ghat Mandani भेंडवळ घटमांडणीची साडेतीनशे वर्षाची परंपरा
जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी केली जाते. मांडणीचं भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करतात. घटमांडणी नेहमी प्रमाणं शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. शेतकरी मोठ्या उत्साहानं या घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकितं वर्तवण्यात येतात.