8.5 C
New York

Asteroid: सावधान ! एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे

Published:

वॉशिंग्टन: सध्या जगभरात एका धोकादायक लघुग्रहाची (Asteroid) जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेन अंतराळ संस्था नासाने या ग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची भीती व्यक्त केली आहे. या लघुग्रहाचा शोध जानेवारी 2022 मध्ये लागला होता. लघुग्रहांचे पृथ्वीवर आदळणे धोकादायक मानले जाते. खगोल शास्त्रज्ञांच्या मते एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा विध्वंस होऊ शकतो. यापूर्वी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याने डायनासोर नष्ट झाले होते.

यापूर्वीही लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खगोल शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केली असली तरी सुदैवाने तसे कधीच झाले नाही. अनेकदा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेले आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासा पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या लघुग्रहांबाबत इशारे देत असते. सौरमालेत मोठ्या प्रमाणात लघुग्रह आढळतात. सध्या पृथ्वीभोवती 16 हजार लघुग्रह फिरत आहेत.

भारतामध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या कमी ?

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (जेपीएल) लघुग्रह 2022 बीएस2 बाबत हा अलर्ट जारी केला आहे. 2022 मध्ये सापडलेला हा लघुग्रह सूर्याभोवती 380 दिवसांत आपली प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा लघुग्रह अपोलो समूहाचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. हा लघुग्रह 95 फूट उंच असून पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. त्याचा ताशी वेग 29585 किलोमीटर इतका आहे.

ब्रह्मांडात अनेक उल्का, धूमकेतू आणि लघुग्रह आहेत. जर एखादा ग्रह गुरुत्वाकर्षणाच्या आवाक्यात आला तर पृथ्वीशी त्याची टक्कर होऊन ते नष्ट होतात. पृथ्वीवर असे कधी घडले तर मोठा अनर्थ घडू शकतो. अलीकडे 1908 मध्ये एकदा घडले होते. सायबेरियातील तुंगुस्का येथे एक लघुग्रह पृथ्वीवर आदळण्यापूर्वी नष्ट झाला होता. त्यातून सुमारे 100 मीटर आकाराचा आगीचा गोला तयार झाला, त्यामुळे सुमारे आठ कोटी झाडे नष्ट झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img