21 C
New York

Ajit Pawar : पंकजांच्या बीडमध्ये अजितदादांचा हिरमोड

Published:

लोकसभेतील विविध (Lok Sabha Elections) मतदारसंघात येत्या 13 मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) प्रचारसभेत उपमुख्यमंत्र अजित पवारांनी (Ajit Pawar) भाषणा उभं राहताच उघडपणे नाराजी बोलून दाखवली.

Ajit Pawar माझी माणसं आणि मतदार भर उन्हात उभी

अजितदादा म्हणाले की, आजची बीडमधील सभा ही महायुतीची सभा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, संयोजकांना महायुतीची सभा असताना मंडप केवढा असायला पाहिजे होता. संयोजकांनी महायुतीच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सभास्थळी मंडप टाकला पाहिजे होता. मंडप कमी टाकल्याने सभेला उपस्थित राहिलेले माझी माणसं आणि मतदार भर उन्हात उभी आहेत. यासाठी मी पूर्णपणे संयोजकांना जबाबदार धरेन असे अजितदादा म्हणाले. यावेळी अजितदादांनी दुसऱ्या का तिसऱ्या टप्पातील प्रचारादरम्यान उन्हामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सर्वांनी वाढत्या उन्हात काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

ठाकरे गटाच्या आणि महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा

Ajit Pawar ही निवडणूक भावनिकतेची नसून…

सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, 1967 साली याच मतदारसंघाने क्रांतिसिंग नाना पाटील यांना लोकसभेत निवडणून पाठवल्याची आठवण अजित पवारांनी सांगितली. पाटील हे सांगली साताऱ्याचे होते. परंतु, जनहितासाठी नेतृत्त्व करणाऱ्यांना हा मतदारसंघ कायम साथ देत आलेला आहे. सर्व जातीधर्मांमध्ये बंधूभाव टिकून रहावा यासाठी छोटा जर घटक असला तरी त्याला न्याय देण्यासाठी महायुतीचं सरकार आणि कार्यकर्ते काम करत आहेत. ही निवडणूक भावनिकतेची नसून देशाचं भवितव्य घडवणारी आहे. आपल्या सर्वांना महायुतीच्या माध्यामातून बीडच्या मागासलेपणा शिक्का मिटवून टाकायचा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img