19.7 C
New York

Illegal Alcohol : अवैध मद्य वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

Published:

ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )

 शिरूर तालुक्यातील शिक्रापुर गावाचे हद्दीत (Illegal Alcohol) तसेच वढू बुद्रुक ता.शिरूर जि.पुणे गावच्या हद्दीत अवैध हातभट्टी गावठी दारूची निर्मीती करणाऱ्यांवर तसेच जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाचे हद्दीत, आळेफाटा-नगर रोडवर एका हॉटेल समोर विदेशीमद्याने भरलेले अवैध मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह, वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगाव यांनी कारवाई करत,या तिन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण १७ लाख ३० हजार ३२१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक एस.ए.गायकवाड व दुय्यम निरीक्षक अनुक्रमे एस. पी. जाधव,एस.एफ.ठेंगडे यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी.राजपुत,पिंपरी चिंचवड विभागाचे उपअधिक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क नारायणगांव विभाग, पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दि. १० मे रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शिक्रापुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात शिक्रापुर गावाचे हद्दीत ता.शिरूर जि. पुणे याठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार स्टाफसह सदर ठिकाणी जात असताना हातभट्टी गावठी दारूची निर्मीती होत असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी ५०० लिटर क्षमतेचे १ प्लॅस्टीक बॅरल रसायनाने भरलेले, २०० लिटर क्षमतेचे ४ प्लॅस्टीक बॅरल रसायनासह, ८०० लिटर क्षमतेचे १ लोखंडी भट्टी बॅरल अंदाजे २०० लिटर रसायनाने भरलेले व गावठी दारू निर्मितीचे इतर साहीत्य मिळून आले.या ठिकाणी एकूण ६०,६०० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.

मतदानाच्या पूर्वसंध्येला बँक सुरु ठेवणं पडलं महागात

तसेच वढू बुद्रुक गावाचे हद्दीत ता.शिरूर जि.पुणे याठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जात असताना हातभट्टी गावठी दारूची निर्मीती होत असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी ५०० लिटर क्षमतेचे २ प्लॅस्टीक बॅरल रसायनाने भरलेले,२०० लिटर क्षमतेचे २ प्लॅस्टीक बॅरल रसायनासह असा एकुण ५०,४०० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.

तसेच याच दिवशी नगर कल्याण महामार्ग विदेशीमद्याची वाहतुक होणार असल्याचे मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे स्टाफसह बेल्हे गावाचे हद्दीत, आळेफाटा-नगर रोडवर, हॉटेल वैभव समोर सापळा लावून संशयास्पद वाहनांची तपासणी करीत असताना एक अशोक लेलॅन्ड कंपनीची दोस्त पल्स चारचाकी वाहन तपासणी कामी थांबविले. वाहनाची तपासणी कली असता त्यामध्ये विदेशीमद्याने भरलेले ११५ बॉक्स १८०मिलीच्या ५४४८ सिलबंद बाटल्या, ३७५ मिलीच्या २४ सिलबंद बाटल्या,२००० मिली ३ सिलबंद बाटल्या व बिअरचे १०१ बॉक्स ६५० मिलीच्या १२०० सिलबंद बाटल्या,५०० मिलीच्या २४ सिलबंद बाटल्या असा वाहनासह एकूण किंमत रूपये १६.१९.३२१ रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर याहनासह मुद्देमाल जप्त करून वाहनचालकास नाव गाव विचारले असता त्याने, त्याचे नाव वयन विठ्ठल सुर्यवंशी, वय ३५ वर्षे, राहणार गाऊली कॉलनी, फुरसुंगी, पुणे असे सांगितले.

सदर तीनही गुन्ह्यांमध्ये एक चारचाकी वाहन व २९०० लिटर गावठी हातभट्टी दाराचे रसायन, ९९५.६५ लिटर विदेशीमद्य, बिअर ७९२ लिटर असा एकूण १६,३०,३२१ रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक एस. ए.गायकवाड व दुय्यम निरीक्षक अनुक्रमे एस.पी. जाधव,एस.एफ.ठेंगडे ,सहाय्यक दुय्यूम-निरीक्षक डी. डी. माने, तसेच सर्वश्री जवान, जे. जी. दाते, एस.टी.सुर्वे, व्ही.डी.विंचूरकर आदिंनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगावचे दुय्यम निरीक्षक एस.एफ. टेंगडे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img