19.7 C
New York

Junnar Leopard : पिंपरी पेंढार शिवारात दोन बिबटे आणि बिबट्याची मादी जेरबंद

Published:

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार (Junnar Leopard) येथील गाजरपटात शुक्रवारी दि.१० रोजी सकाळी बिबट्याने हल्ला करून नानूबाई सिताराम कडाळे या महिलेवर हल्ला ठार मारले होते. घटनास्थळी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शुक्रवारी त्याच दिवशी, त्याच ठिकाणी सायंकाळी बिबट्याची मादी एक नर बिबट्याला तसेच शनिवारी त्याच ठिकाणी पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात जुन्नर वनविभागाला यश आले आहे.या एकाच ठिकाणी पकडलेल्या बिबट्यांची एकूण संख्या तीन झाली आहे. मात्र नानुबाई कडाळे हिच्यावर हल्ला केलेला बिबट्या नेमकी कोणता आहे ? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याचे वय दोन वर्ष असून,बिबट्याच्या मादीचे वय सात ते आठ वर्ष आहे. तसेच शनिवारी दि.११ रोजी जेरबंद केलेल्या बिबट्याचे वय दोन वर्ष असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यात एका महिन्याभरात बिबट्याने हल्ला करून, तिघांचा बळी घेतला आहे.बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या  वाढत्या हल्ल्याने पिंपळवंडी,काळवाडी, पिंपरी पेंढार या गावांसह जुन्नर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान दरम्यान दि.१० रोजी सकाळी भर दिवसा झालेल्या या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यासह मृत महिलेचे नातेवाईक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शिवारात हाहाकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

घटनास्थळी या मृत महिलेच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. बिबट्या आता आणखी किती लोकांचा जीव घेणार ? असा सवाल नागरिक करत होते.वनविभागाने तालुक्यातील सर्व बिबट्यांना पकडावे किंवा बिबट्या दिसताक्षणी त्याला गोळ्या घालण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नागरिक करत होते.

भरदिवसा घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे, संपूर्ण तालुकाच हादरला असून, या घटनेमुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून,पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान पिंपरी पेंढार गाजरपट या ठिकाणी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काळवाडीत १२ पिंजरे,पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे ९ पिंजरे,पिंपरी पेंढार गाजरपट येथे १० पिंजरे,खामुंडी २ पिंजरे,शिरोली खुर्द येथे २ पिंजरे,ऊंब्रज येथे २ पिंजरे असे या परिसरात एकुण ३७ पिंजरे आहेत, तसेच २५ ट्रॅप कॅमेरे आणि गाजरपट,काळवाडी,धोलवड येथे थर्मल ड्रोन च्या साह्याने रात्रंदिवस सर्वेचे काम अध्यापही सुरू असून, या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह वन कर्मचारी दिवस-रात्र गस्त घालणार असल्याचे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img