0.7 C
New York

Chhattisgarh : 12 नक्षलवाद्यांचा खात्मा, मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले

Published:

शुक्रवारी नक्षलविरोधी अभियानात छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बीजापुरमध्ये जवानांना मोठं यश मिळालंय. शुक्रवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत जवानांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पोलीस पथक ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. परिसरात सतत शोध सुरु आहे. तर भूसुरुंग स्फोटामुळे दोन जवान जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या माओवादी विरोधी मोहिमेअंतर्गत 8 मे रोजी प्रतिबंधित सीपीआय माओवादी संघटना (PLGA) कंपनी क्रमांक 2 कमांडर वेल्ला, गांगलूर क्षेत्र समितीचे सचिव दिनेश मोदियाम आणि इतर 100-150 सशस्त्र माओवाद्यांना अटक करण्यात आली

Chhattisgarh काय म्हणाले मुख्यमंत्री विष्णू देव साई

यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांची यावर प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी ऑपरेशनच्या यशासाठी जवानांचं अभिनंदन केलंय. ते म्हणाले की, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. बीजापुरमध्ये पोलिस-नक्षल चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडमध्ये आम्ही सत्तेत आल्यापासून आम्ही नक्षलवादाचा जोरदार मुकाबला करत आहोत.

भाजप लोकशाहीसाठी संकट, शरद पवारांची टीका

Chhattisgarh नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त

त्यानंतर या परिसरात शोध मोहिमेदरम्यान, 10 मेच्या सकाळी 6 वाजताच्या सुमारास पीडिया जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर घटनास्थळावरून 12 माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. तर बीजीएल लाँचर, 12 बोअरची बंदूक, देशी बनावटीची रायफल, बीजीएल सेल, प्रचंड प्रमाणात स्फोटके, माओवाद्यांचा गणवेश, काठी, औषधे, प्रतिबंधित माओवादी संघटनेचे प्रचार साहित्य आणि माओवादी साहित्य हे देखील घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या परिसरात अधिक शोध घेत आहेत.

Chhattisgarh या आधीच्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले

या आधी 30 एप्रिल रोजी बस्तर पोलिसांना नारायणपूर चकमकीत मोठे यश मिळाले होते. नक्षलवादी आणि जवानांमध्ये सुमारे 9 तास चाललेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. 29 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सैनिक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात शोधासाठी निघाले होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर 30 एप्रिलला सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांचा अबुझमाडमधील ताकामेटाच्या जंगलात नक्षलवाद्यांशी सामना झाला. त्यामध्ये 10 नक्षलवादी मारले गेले तर घटनास्थळावरून एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img