21 C
New York

Junnar : शिवारात हाहाकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Published:

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

जुन्नर (Junnar) तालुक्यातील पिंपळवंडी लेंडेस्थळ शिवरात बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्यानंतर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी दि.१० रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

पिंपळवंडी ( लेंडेस्थळ ) शिवारात रविवार 5 मे रोजी अश्विनी मनोज हुलवळे ही महिला शेतात खुरपणीचे काम करत असताना, बिबट्याने झडप मारून, शेजारील ऊसाच्या शेतात ओढत नेऊन, तिच्यावर हल्ला केला होता.दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करून,सदर महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडविले.सदर महिला ही बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असल्याने तिच्यावर आजही नारायणगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 पिंपरीपेंढारमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

दरम्यान पिंपळवंडी लेंडेस्थळ शिवारात शुक्रवारी जेरबंद करण्यात आलेला बिबट्या, हा नर असून त्याचे वय सात ते आठ वर्षाचे आहे.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने याठिकाणी दहा पिंजरे लावले होते. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आठ ट्रॅप कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने सर्वेचे काम सुरू होते.बिबट्याला जेरबंद केल्यानंतर  रेस्क्यू टीम व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img