23.1 C
New York

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात

Published:

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक निकामी झाल्याने एका ट्रकने टेम्पो व समोरील कारला धडक दिली. या अपघातात कारमधील दोन जण आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. पुणे येथून मुंबईकडे येत असताना अपघात झाला, अपघातातील जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 जण गंभीर जखमी आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक कोंबडीची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि पुढे ओमनी कारला धडकला. ट्रकच्या धडकेने भीषण हा अपघात झाला.

ट्रकची धडक इतकी जोरदार होती की ओम्नी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ओम्नीमधील 3 जण जखमी झाले. या अपघातात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकच्या धडकेत 4 जण गंभीर जखमी झाले. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू केल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहने एक्स्प्रेस वेवरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img