8.4 C
New York

Sunny Deol:‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या ‘बॉर्डर २’ चा सिक्वेल

Published:

‘गदर २’ (Gadar 2) च्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर बॉलीवूड अभिनेते सनी देओल (Sunny Deol) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘गदर २’ ने गेल्यावर्षी चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. २० वर्षांनी ‘गदर’ चा रिमेक ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पुन्हा सनी देओलचा एका जुन्या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकर ‘बॉर्डर’ (Border) या मल्टीस्टारर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अद्याप या चित्रपटाचा सिक्वेल सिनेमागृहांमध्ये कधी येणार याची तारीख आली आहे. मात्र, यासाठी प्रेक्षकांना अजून बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. २०२६ मध्ये हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.


एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, निर्माते या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच घेऊन येत आहेत.सनी देओलसोबत आयुष्मान खुराना (Ayushmann Khuranna) देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपट भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा गौरव करणारा आहे त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच दिसणार एकत्र!


सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या कथेवर जवळपास वर्षभरापासून काम सुरू आहे. ‘बॉर्डर पार्ट १’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट व्हावा, या दृष्टीकोणातून चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत माहिती समोर आलिया हे. यावेळी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या युद्धाची कथा दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही लढाई राजस्थानमधील थारच्या लोंगेवाला भारतीय चौकीवर झाली होती. हा आजवरचा सर्वात मोठा युद्धपट ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे. पहिल्या भागापेक्षा या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img