23.1 C
New York

Sikandar: सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच दिसणार एकत्र!

Published:

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) दरवर्षी ईदला नवा चित्रपट प्रदर्शित करतो. मात्र यावर्षी त्याने २०२५ मध्ये रिलीझ होणाऱ्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात सलमानसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. तर आता याविषयी माहिती देत चाहत्यांना दिलासा दिला आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सलमानसोबत सिकंदर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रश्मिकाने नेहमीच तिच्या अभिनय आणि लूक्समुळे चाहत्यांना भुरळ पाडली आहे. लवकरच ही साउथ स्टार भाईजान सलमान खानबरोबर आगामी चित्रपटात झळकणार आहे. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गुड बाय’ चित्रपटाद्वारे रश्मिकाने बॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

२० वर्षांचा अब्दु रोजिक करणार लग्न!

त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ॲनिमल’ चित्रपटात झळकली. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं जगभरात ९१७.८२ कोटींची कमाई केली. आता रश्मिका मंदाना पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा रश्मिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे केली. प्रख्यात दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आणि सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग मे महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल जरी अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अंदाजे या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी इतकं असेल. २०२५च्या ईदला रिलीझ होणार चित्रपट ‘सिकंदर’ आधीच आपलं स्थान रिलीज स्लॉटमध्ये निश्चित केलं आहे. सलमान-रश्मिकाची जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, रश्मिकाच्या ‘सिकंदर’ वगळता अल्लू अर्जुनसोबत पुन्हा ‘पुष्पा-२ ‘ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलबरोबर रश्मिका ‘छावा’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पार पडलं. द गर्लफ्रेंड’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या एक दिवसानंतर ही साउथ स्टार धनुषबरोबर शूटिंगला सुरुवात करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img