23.1 C
New York

Pre-Monsoon Rain : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे होणार आगमन

Published:

दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-Monsoon Rain) आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारपासून (दि. 11) मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची (Weather Forecast) शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या आठवड्याच्या शेवटी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस पडेल. तर 10 मे पासून धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईच्या आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला गती द्यावी, असं आवाहनही करण्यात आला.

राज्यातील कोकण वगळता इतर विभागातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे (Rain) आगमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज 9 मे रोजी मराठवाड्यसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पुणे, संभाजीनगर, हिंगोली,वाशिम, यवतमाळ (yavatmal) या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहताना पाहायला मिळाला.

मोदींच्या हातातून निवडणूक निसटली, राहुल गांधींची टीका

Pre-Monsoon Rain पुढील २४ तासांत मान्सूनपूर्व पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मुंबईच्या पूर्वेला बदलापूर, कर्जत, कल्याण-डोंबिवली, पनवेल आदी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.Pre-Monsoon Rain पुढील २४ तासांत मान्सूनपूर्व पाऊस

Pre-Monsoon Rain कोठे कोसळणार पाऊस?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. IMD च्या अंदाजानुसार 11 मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img