दबावातून तक्रार केल्याचा महिलेचा दावा
बंगळुरू
कर्नाटकमधील जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या सेक्स व्हिडिओ स्कँडलला (Sex scandal) नवे वळण मिळाले आहे. प्रज्वल रेवण्णा तसेच त्यांचे पिता एच डी रेवण्णा यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच.डी. कुमारस्वामी यांनी दबाव टाकल्याचे तक्रारदार महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाला (ncw) दिलेल्या जबानीत म्हटले आहे.
प्रज्वल सध्या फरार आहे. तो परदेशात
कर्नाटकातील या बहुचर्चित सेक्स स्कँडलला सध्या राजकीय वळण मिळाले आहे. हसनचे जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी यांचे नातू आहेत. जेडीएसचे आमदार एच.डी. रेवण्णा आणि त्यांच्या खासदार आय या मुलावर सध्या लैंगिक छळाचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार एच.डी. रेवण्णा यांना अटक करण्यात आली आहे, तर प्रज्वल सध्या फरार आहे. तो परदेशात आहे. जेडीएस कर्नाटकात विरोधी पक्षात आहे. तिथे काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोग देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रज्वल आणि एच.डी. रेवण्णा यांच्यावर तक्रार करण्यासाठी कुमारस्वामी यांनी दबाव टाकल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. विशेष म्हणजे कुमारस्वामी हे प्रज्वलचे चुलते आणि एचडी रेवण्णा यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यामुळे या प्रकरणाला कौटुंबिक संघर्षाची किनार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे राज्य पोलिसांची एसआयटीदेखील या महिलांविरुद्ध दबाबतंत्र अवलंबवत आहे. रेवण्णा पितापुत्रांविरुद्ध आणखी आरोप करण्यासाठी तक्रारदार महिलेवर दबाव टाकला जात आहे, तसे न केल्यास तुम्ही वेश्याव्यवसाय करता, असा आरोप करण्यात येईल, असे एसआयटीचे अधिकारी म्हणत आहेत, असा दावा एका जेडीएस नेत्याने केला.