21 C
New York

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Published:

आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमदून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षंकांची मन जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिच्या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करून त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली. फुलवंती (Phullawanti) असं या चित्रपटाचं नाव आहे.

Prajakta Mali घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर

पॅनोरमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.


‘ये रे ये रे पैसा 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Prajakta Mali ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीवर आधारित असून पेशवेकालीन महाराष्ट्रातील लावणीची कला आणि एक सुंदर प्रेमकथा या सिनेमातून उलगडणार आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवोsहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

Prajakta Mali पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा

आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, ‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन,असा विश्वास मला आहे तर. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या सोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. अमोल जोशी प्रोडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img