19.7 C
New York

Sharad Pawar : मोदींच्या ऑफरवर पवारांचा पूर्णविराम

Published:

एकीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे. “बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) चिंतेत आहेत. त्यांनी नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय” असं मोदी म्हणाले. मात्र, ही टीका करताना मोदींनी पवारांना एक मोठी ऑफर दिली असून, पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं म्हटले आहे.त्यावर आता पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे देशाच्या हिताचं नाही त्यात माझं सहकार्य असणार नाही असे म्हणत मोदींनी दिलेल्या ऑफरवर पवारांनी पूर्णविराम दिला आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांच्या आमदाराला अजितदादांचं चॅलेंज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, देशातील तीन टप्प्यातील मतदानातून मोदी सरकारच्या विरोधात जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसतंय. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची ही अस्वस्थता अशा गोंधळ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांतून दिसून येत आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील कोर्टाच्या निकालावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. बऱ्याच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं. ठीक आहे आता कोर्टाने काहीतरी निकाल दिलाय. न्यायदेवतेचा हा निकाल आहे. त्यावर पवार म्हणाले, यासाठी आता राज्य सरकारने एक अपील दाखल करावे आणि ही भूमिका न्यायालयात मांडावी.


नंदुरबारमधून मोदींची पवारांना मोठी ऑफर

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img