8.3 C
New York

Navneet Rana : ओवैसींनी चॅलेंज स्वीकारताच नवनीत राणा म्हणाल्या…

Published:

भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा (Navneet Rana) सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी बुधवारी हैदराबादमध्ये बोलताना थेट ओवैसी बंधुंना आव्हान दिलं. नवनीत राणा यांनी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्या 2012 मधील एका वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देतं. छोटा म्हणतो की पोलिसांना पंधरा मिनिटं हटवा मग आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो.“एक धाकटा आणि एक मोठा भाऊ आहे. त्यातला धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना 15 मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही 15 मिनिटं मागता. पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. पंधरा सेकंद पोलिसांना हटवलं तर छोट्याला (अकबरुद्दीन ओवैसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवैसी) हे कळणार सुद्धा नाही की कुठून आले आणि कुठे गेले. असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. असदुद्दीन ओवैसी यांचा धाकटा बंधु अकबरुद्दीन ओवैसी याच्या काही वर्षापूर्वीच्या वक्तव्यावरुन नवनीत राणा यांनी हे आव्हान दिलं.

Navneet Rana जो जसं बोलणार, तसं उत्तर मिळणार”

नवनीत राणा यांचं हे चॅलेंज हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे असदुद्दीन ओवैसी यांनी स्वीकारलं आहे. त्यांनी एक तास मागितला. आज रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी आलेल्या नवनीत राणा यांना या बद्दल विचारण्यात आलं. यावर नवनीत राणा म्हणाल्या “त्यांनी सांगाव काय करायच ते, मी तयार आहे. जसं बोलतील, तसं उत्तर देऊ, मी तयार आहे. माझी तयारी आहे, त्यांनी सांगावं कुठे यायचं. त्याला जो जसं बोलणार, तसं उत्तर मिळणार” राजकारणात महिलेच्या चारित्र्यावर बोलणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं. “महिलेच्या चारित्र्यावर बोलून त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होतो. त्या लोकांना माझं, एवढच सांगणं आहे, महिलेसोबत लढत असताना आपली पातळी घसरणार नाही याची दक्षता घ्या. आपण लोकाहितासाठी, देशहितासाठी लढतोय. ही काही जिल्हा परिषदेची निवडणूक नाहीय” असं नवनीत राणा म्हणाल्या.

नवनीत राणांचं थेट हैदराबादेत ओवैसींना चॅलेंज

Navneet Rana ...या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली होती

याआधी सन 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीनं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवून देऊ की कुणात किती दम आहे. त्याच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली होती. या प्रकरणात कोर्टाने त्याची सुटका केली होती. परंतु, ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा या वक्तव्याचा दाखला देत ओवैसी बंधूंवर टीका होत असते.

राणा पुढे म्हणाल्या, हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी ही निडणूक आहे. यावेळी तसंच मतदान करायचं आहे. आमची वाघीण माधवी लता यांना संसदेत पाठविण्यासाठी मतदान करायचं आहे. हैदराबादमधील सर्व हिंदूंना जागं करण्यासाठी मतदान करायचं आहे, असे नवनीत राणा या प्रचार सभेत म्हणाल्या. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादांमधील वाद पुन्हा वाढणार?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img