26.6 C
New York

Kedarnath Temple: केदारनाथचे दरवाजे उघडले: चारधाम यात्रेला प्रारंभ

Published:

केदारनाथ (उत्तराखंड)

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Temple) मुख्य द्वार वैदिक मंत्रोच्चारात भाविकांसाठी खुले करण्यात आले. शुक्रवारी सकाळी सात वाजता बम-बम भोले आणि बाबा केदार की जयच्या घोषात विशेष पूजा झाल्यानंतर भाविकांना बाबा केदारनाथाचे दर्शन घेता आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित सुमारे दहा हजार भाविक लष्कराच्या ग्रेनेडियर रेजिमेंटच्या बँडच्या भक्तीमय सुरात तल्लीन झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे भाविकांसाठी खुले


सहा महिने बंद राहिल्यानंतर शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. आजपासून यंदाच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली. सकाळी सात वाजता दोन्ही धामांचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सहपत्नीक केदारनाथचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया पाहिली. सकाळी सात वाजता बम-बम भोले आणि बाबा केदारनाथच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. काही भाविक आवारात डमरू घेऊन नाचताना दिसले. मंदिराला 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. दरवाजे उघडताना हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षावही करण्यात आला. त्याचवेळी उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री धामचे दरवाजेही सात वाजता भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी हजारो भाविक आवारात उपस्थित होते. ते यमुना मातेची जयघोष करत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाविकांचे अभिनंदन करून देश आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. यात्रेकरूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यावेळी चारधाम यात्रा नवा विक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गंगोत्री धामचे दरवाजे दुपारी उघडतील तर चारधाममध्ये समाविष्ट असलेल्या बद्रीनाथचे दरवाजे रविवारी उघडतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img