23.1 C
New York

Justin Bieber: हेली आणि जस्टिन बीबर लवकरच होणार आई-बाबा!

Published:

कॅनेडियन गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) आणि हेली (Hailey Bieber) यांनी मोठी बातमी दिली आहे. जस्टिन आणि हेली २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांनी एका गुप्त समारंभात लग्न केले असल्याची माहिती आहे. त्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे ही गुड न्यूस चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांना ही बातमी समजताच त्यांना खूप आनंद झाला आहे.

आता हेली २७ वर्षाची असून ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे. एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात हेली गरोदर असल्याचं दिसतंय. ह्या व्हिडिओमध्ये हेलीने पांढरा लेस ड्रेस परिधान केला आहे. यूएस रिॲलिटी स्टार किम कार्दशियन आणि मॉडेल गिगी हदीद यांनी अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे.

गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या ‘बॉर्डर २’ चा सिक्वेल


या व्हिडिओमध्ये रोमँटिक क्लिपनी सुरुवात होते. पुढे हेलीच्या पोटाकडे कॅमेरा झूम केल्यामुळे ती गरोदर असल्याची बाब समोर आली. हेली ही अभिनेता स्टीफन बाल्डविनची मुलगी असून ती मॉडेल आहे. मॉडेलिंग व्यतिरिक्त, हेली स्किनकेअर लाइन, रोडची संस्थापक आहे. तर जस्टिन १३ व्या वर्षापासून गायक म्हणून ओळखला जातो. त्याने लव्ह मी आणि यम्मी सारख्या हिट गाण्यांनी पॉप सेन्सेशन बनला होता.

गेल्यावर्षी जस्टिनचा जस्टिस वर्ल्ड टूर दौरा रद्द करण्यात आला होता. सध्या तो रामसे हंट सिंड्रोमपासून बरा झाला. त्यामुळे चेहऱ्याचा अर्धांगवायू होतो. जगभरातून जस्टिन आणि हेलीच्या गुड न्यूसमुळे आनंदाचा वर्षाव सुरु आहे. चाहत्यांनी ‘बेबी बीबर’ अशा कंमेंट्सचा पाऊस पडला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img