3.2 C
New York

Dombivli Crime : मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

बदलापुर-डोंबीवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल- लोकलमध्ये मोबाईल व ल़ँपटॉप चोरी करणाऱ्या 16 जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या चोरट्यांकडून 16 गुन्हे उघडकीस आले असून अडीच लाख रुपये किमतीचे मोबाईल व ल़ँपटॉप हस्तगत करण्यात आले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखा व डोंबिवली रेल्वे पोलिसांची (Dombivli Crime) कामगिरी केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, सत्यराज ओंधुरगा वडारी ( 26 ), कृष्णा गणेश वडारी (27), शक्तीवेल अवालुडन वडारी (२६), गणेश सेल्वम वडारी (24 ), मृर्गेश ऋतुगण वडारी ( ३३ ), बालाजी कालीअप्पम वडारी ( ३९ ) कार्तीकेत वृतुगण वडारी ( ३६ ) अशी अटक केलेल्या सात चोरट्यांची नावे असून ते वेल्लुर, तामिळनाडु येथे राहतात.या टोळीकडून एकुण १६ गुन्हे उघडकीस झाले असून एकुण 2,07,987 रुपये किमतीचे 11 मोबाईल फोन व 1 लॅपटॉप हस्तगत केले.हि टोळी बदलापुर –डोंबिवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल-लोकलमध्ये चोऱ्या करत असल्याची माहिती रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख व डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांना माहिती मिळाली. पोलीस उप आयुक्त मनोज पाटील यांचे मार्गदर्शनानुसार वपोनि अरशुद्दीन शेख यांनी या टोळीचा शोध घेतला.१ मे रोजी चोरटे कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.१जवळ दिसल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी चोरट्यांना पकडले.अटक आरोपींकडून रेल्वे पोलिसांनी एकुण 2,07,989 रुपये किंमतीचे 11 मोबाईल फोन व एक लॅपटॉप हस्तगत केले.

सदरची कामगिरी लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे शाखा ) अरशुद्दीन शेख, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, डोंबिवली रेल्वे पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार राजेंद्र दिवटे, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मीता वसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रविंद्र ठाकुर, सोनाली पाटील, हितेश नाईक, अजित माने, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे, तसेच डोंबिवलीरेल्वे पोलीस ठाणे पोलीस उपनिरी संजय नस्टे, सपोफी सुधीर चौधरी, पोलीस अंमलदार भांडारकर, पाटील, तांत्रीक शाखेचे सपोनि मंगेश खाडे, पोलीस अंमलदार अहिनवे यांनी बजावली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img