23.1 C
New York

Mani Shankar Aiyar: पाकिस्तानचा आदर करा, नाहीतर ते अणुबॉम्ब टाकतील

Published:

मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली
रावळपिंडीत पाकिस्तानकडेही अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये. भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे. जर आपण त्यांचा आदर केला नाही. त्यांच्याशी चर्चा केली नाही, तर ते भारताविरुद्ध अणुबॉम्बचा वापर करू शकतात, असे धक्कादायक आणि वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांनी केले. भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना जोरात सुरू आहे.काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला फोडणी मिळाली आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या विधानानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मणिशंकर अय्यर यांनी आपल्या वक्तव्यातून पाकिस्तानशी चर्चेचा पुरस्कार केला आहे. मणिशंकर अय्यर म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने त्यांचा आदर केला पाहिजे. मणिशंकर अय्यर यांचे हे विधान आल्यापासून भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल करत आहे. मणिशंकर अय्यर यांचे पाकिस्तानप्रेम पुन्हा जागृत झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. मणिशंकर यांच्यावर निशाणा साधत भाजपचे शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसचे पाकिस्तानप्रेम संपत नाही.

भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करू शकतात


मणिशंकर अय्यर म्हणाले की, भारताने पाकिस्तानचा आदर केला नाही, त्यांच्याशी चर्चा केली नाही तर ते भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करू शकतात. रावळपिंडीत पाकिस्तानकडेही अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये, असा इशाराहि द्यायला मणिशंकर अय्यर विसरले नाहीत. यांचे हे वक्तव्य सध्या खूप व्हायरल होत आहे. मणिशंकर अय्यर म्हणाले की, पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे आणि त्याचा आदरही केला जातो. भारतात राहून एक शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानधार्जिणे मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य काँग्रेसची मानसिकता दर्शवत असल्याची टीका होत आहे. एकीकडे पाकिस्तनाची अवस्था भिकेकंगाल झाली असून जगभर मदतीसाठी याचना करत फिरत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीविषयी पाकिस्तानात प्रचंड क्रेज असताना मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य म्हणजे भारतालाचा घाबरवण्याचा प्रकार आहे. यावर जनतेत संताप व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img