21 C
New York

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्ली कोर्टाचा झटका

Published:

नवी दिल्ली

भाजपचे नेते तथा भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांना दिल्ली कोर्टाने मोठा झटका दिला आहे. कुस्तीपटू महिलेचा लैंगिक शोषण केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्ली कोर्टाने (Delhi Court) पोलिसांना दिले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता पीडित महिलेंकडून दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात आले होते.

कोर्टाने म्हटले की ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या इतके सबळ पुरावे आहे त्यांच्या विरोधात कलम 354 आणि 354 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र याचबरोबर सहाव्या महिलाकुस्तीपटूने केलेल्या आरोपांमधून कोर्टाने ब्रिजभूषणची निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्ली कोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाचा माजी सचिव विनोद तोमर याच्याविरूद्ध देखील महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img