10.6 C
New York

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा प्रकरणी मोठी अपडेट

Published:

प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) Bप्रदीप शर्मा प्रकरणी मोठी अपडेट यांना सुप्रीम कोर्टाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोन महिन्यांपूर्वी 19 मार्चला प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुंबई हायकोर्टाच्या या निकालाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांना कायम जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हत्या ते शिक्षा 11 वर्षांत काय काय घडलं ?

प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अट सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या डबल बेंचने याबाबतचे आदेश दिले आहेत. सात दिवसात जामीन प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टानं निर्दोश मुक्तता केली होती.

Pradeep Sharma नेमकं प्रकरण काय?

अंधेरीतील सात बंगला येथे प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 11 नोव्हेंबर 2006 ला फेक चकमक घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या चकमकीत त्यांनी लखनभैयाची हत्या केली होती. तसेच लखनभैयाची एन्काउंटरमध्ये हत्या झाल्याचा बनाव रचला होता, असा आरोप करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img