नवी दिल्ली
दिल्ली दारू धोरण घोटाळा (Delhi liquor scam) प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने (ED) अटक केली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर केजरीवाल तिहार कारागृहातून मधून बाहेर आल्यानंतर संवाद साधताना मोदी सरकारवर (PM narendra modi) हल्लाबोल केला आहे. यावेळी आप (AAP) कार्यकर्त्यांनी तिहार जेल बाहेर केजरीवाल यांचे जंगी स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आधारित केजरीवाल यांना मिळालेल्या अंतरीन जामीनामुळे इंडिया आघाडीला (India Alliance) मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की या देशातील सर्व 140 कोटी जनतेने हुकूमशाहीविरोधात लढायचे आहे. सर्वांनी हुकूमशाहीविरुद्ध एकत्र लढले पाहिजे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तन, मन, धनाने लढत असल्याचे ते म्हणाले. पण हा लढा माझा एकट्याचा नाही. या लढ्यात देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 51 दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी संध्याकाळी अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत. यावेळी तुरुंगाबाहेर केजरीवाल यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केजरीवाल तुरुंगाबाहेर येताच ते गाडीत बसले आणि तिथे उपस्थित लोकांना अभिवादन करून ते थेट घराकडे रवाना झाले आहेत.