अभिनेता आयुष्य शर्मा (Ayush Sharma) आणि सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan) यांच्या लग्नाला जवळपास १० वर्षे झाली आहेत. अर्पिता खान शर्माला अनेकदा ट्रोल केलं जात. कधी रंगावरून, तर कधी वजनावरून. आयुष्य आणि अर्पिताच्या लग्नाला १० वर्ष झाली असून दोघांनाही बऱ्याचदा ट्रोल केलं जातं. या जोडप्याने वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत . त्यांनी १० वर्षांच्या संसारात या दोघांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आयुषलाही पत्नीच्या दिसण्यावरून बऱ्याचदा नकारात्मक कमेंट्स येतात. अशातच दोघांच्या घटस्फोटाच्या अफवाही अनेकदा येतात.
२०१९ पासून अचानक या जोडप्याविषयी घटस्पोटाच्या चर्चा सुरु होत्या. दोघांना ते ऐकून धक्का बसला होता, असे देखील आयुषने सांगितले. एका मुलाखतीत आयुष म्हणाला, “एक दिवस मी मुलाला डोसा खाऊ घालण्यासाठी बाहेर पडलो होतो आणि तिथून परत येताना मला पापाराझींनी अडवलं आणि विचारलं की अर्पिता आणि मी घटस्फोटासाठी अर्ज करत आहोत का? माझ्या आयुष्यात माझ्याबद्दल अफवा पसरवण्याइतपत कोणालाच रस नाही.” असे विधान आयुषने केले. हा प्रश्न ऐकून मात्र अर्पिता हसू लागली. “मला प्रचंड आश्चर्य वाटलं! मी माझ्या मुलाला खायला बाहेर नेलं अन् मला आमच्या घटस्फोटाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. मी हा प्रश्न अर्पिता विचारला त्यावर ती हसू लागली.” असे उत्तर आयुषने दिले.
सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच दिसणार एकत्र!
अर्पिताने आयुषला गेल्या १०-११ वर्षापासून त्याच्या करिअरमध्ये खंबीरपणे साथ देत आहे. अर्पिताविषयी आयुष म्हणाला, “अर्पिता प्रचंड कठोर टीकाकार आहे. पण तिचे शब्द कठोर असले तरी ती खूप प्रामाणिक आहे. ती अशी व्यक्ती आहे जी अतिशय ऑब्जेक्टिव्हली चित्रपट पाहते. मी ज्या प्रकारचे चित्रपट करतो त्या तुलनेत तिची आवड वेगळी आहे. तिला माहित आहे की मला लोकांसाठी कमर्शिअल चित्रपट बनवायला आवडतात, पण तिला मात्र सत्य कथांवर आधारित चित्रपट पाहायला जास्त आवडतं,” असा आयुषने खुलासा केला. आयुष-अर्पिता एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यानंतर दोघे एक वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते २०१४ मध्ये लग्नबंधनात अडकले.