3.8 C
New York

Amol Kolhe : अमोल कोल्हे घेणार अभिनयातून संन्यास ?

Published:

सध्या लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शेवटच्या काही तांसावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे, उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांची लगबग व प्रचारासाठीचा जोर दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर (Shirur) व मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (NCP) विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे.

Amol Kolhe अमोल कोल्हे घेणार अभिनयातून संन्यास ?

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिरुरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पाच वर्षे अभिनयातून संन्यास घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. “शिरुर लोकसभा मतदारसंघाची ही जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी माझ्यावर आहे. या जबाबदारीच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.

चौथ्या टप्प्यात पाहायला मिळणार दिग्ज्यांमध्ये घमासान

अभिनयातून संन्यास घेण्याच्या निर्णयाविषयी ते पुढे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांमध्ये मी फक्त एकच मालिका केली. विरोधकांचा धादांत अपप्रचार आहे की अमोल कोल्हे व्यस्त होते. हा जनसंपर्क कमी असण्याची काही वेगळी कारणं आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही सगळी वेगळी कारणं समोर येतील. परंतु हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला, तरी माझी काही हरकत नाही. मी तो ब्रेक घ्यायला तयार आहे. या पाच वर्षांत शिरुर मतदारसंघातील जनतेला पुरेसा वेळ देण्याच्या दृष्टीने मी अभिनयातून ब्रेक घेत आहे.”

Amol Kolhe केवळ हा अपवाद राहिल

छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहिले, त्यामुळे या व्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही, अशा शब्दात अमोल कोल्हेंनी पुढील 5 वर्षांसाठीची भूमिका जाहीर केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img