21 C
New York

Ajit Pawar : शरद पवारांच्या आमदाराला अजितदादांचं चॅलेंज

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना मंत्रीपद देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.”दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं.

शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, दिलीपराव वळसे पाटलांचा शपथ विधी झाली की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. आता आपलं काही जमणार नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यानं तसं सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगिलतं की, ते असं म्हणत होते आणि नंतर तो तिकडे गेला.

त्याला गाजर दाखवण्यात आले आहे. पुढच्या वेळी तू मंत्री होणार, असे साहेबांनी त्याला सांगितले. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाटी त्याने कारखान्याची वाट लावली. बाकी सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालास. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला आमदार पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि अजित पवारांबद्दल काहीही बोलू शकत नाही. अजित पवारांना अशी दमबाजीची भाषा शोभत नाही, मी आमदार व्हायचं की नाही हे शरद पवार आणि जनता ठरवेल, असं पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img