8.4 C
New York

Abdu Rozik: २० वर्षांचा अब्दु रोजिक करणार लग्न!

Published:

प्रसिद्ध गायक, ‘दुबईचा छोटा भाईजान’ आणि ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वातून घराघरात पोहोचलेला अब्दु रोजिक (Abdu Rozik) नेहमीच चर्चेत असतो. मात्र अब्दुने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती दिली. छोट्या भाईजानने आयुष्यभराची जोडीदार शोधली आहे. सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे.


सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अब्दू म्हणाला, “हॅलो. सगळेजण कसे आहात? मी अब्दु रोजिक. मी २० वर्षांचा आहे, हे तुम्हाला माहित आहेच. माझं स्वप्न होतं की, माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी आणि माझा आदर करणारी मुलगी मिळू दे. आता मला ती मुलगी भेटली आहे; जी माझा आदर करते आणि माझ्यावर खूप प्रेम करते. मला माहित नाही कसं सांगू? पण मी खूप उत्साही आहे.” त्यानंतर अब्दुने होणाऱ्या बायकोसाठी घेतलेली अंगठी दाखवली.

मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्यानी केला मेट्रोने प्रवास!


अब्दुने गुरुवारी हि पोस्ट शेअर करत, ७ जुलैला लग्न करणार असल्याची माहिती दिली. तो दुबईमधील अमीरा नावाच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. त्याची होणारी बायको १९ वर्षाची आहे. हा व्हिडीओ शेअर करत अब्दुने लिहिलं आहे, “मी माझ्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता की, मी एवढा नशीबवान असेन. कारण माझ्यावर खूप प्रेम करणारी व आदर करणारी आयुष्यभराची जोडीदार मला भेटली आहे. ७ जुलै तारीख लक्षात ठेवा. मी खूप आनंदी आहे की हा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.”


शिव ठाकरेला याबाबत एका मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर शिव म्हणाला, “मी आताच अर्ध्या तासापूर्वी अब्दूसोबत बोललो परंतु त्याने मला काही सांगितले नाही. त्याच्या रिलेशनच्या बातम्या मला सोशल मेडियावरून कळत होत्या. त्यामुळे हि माहिती खरी आहे की खोटी, यासंदर्भात मला कल्पना नाही.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img