11.6 C
New York

Kalyan Crime : 6 महिन्याच्या बाळाचे अपहरण,’ते’ 6 जण अन् 26 लाखाची किंमत

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

मध्यप्रदेशात एका सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना 6 मे रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील पनवेल येथील एका शिक्षकाला सहा महिन्याचे बाळ पाहिजे होते. त्यासाठी त्याने 29 लाख रुपये खर्च केले. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी (Kalyan Crime) एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये मुंबईतील एका रुग्णालयात काम करणारा अटेण्डंट, शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी , एक रिक्षा चालक, या रिक्षा चालकाच्या शेजारी राहणारे दांम्पत्य आणि पनवेल येथून शिक्षकाला अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 मेच्या रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरुन एका बाळाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. फेरीचे काम करणारे एक दांम्पत्य रस्त्यावरील फूटपाथवर झाेपले असताना दोन अज्ञात मोटरसायकलस्वार दाम्पत्यांजवळ आले.अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्या दाम्पत्यांकडील सहा महिन्याच्या बाळाला जबदरस्तीने उलचून पळाले.घाबरलेल्या दाम्पत्यांनी सीव्हील लाईन पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना अटक केली. या कालावधीत बाळाला महाराष्ट्रात आणले होते. अपहरणकर्त्यांनी कल्याण मधील नितीन साेनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दांम्पत्याना बाळ दिला असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांना सांगितले.मध्यप्रदेशातील पोलिसांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. मध्य प्रदेश पोलिस कल्याणला पोहचले. कल्याण परिमंडळ -3 पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार केली खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या दोघांना सांगितले की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले.पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेतले असता तो म्हणाला , हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला दिले. पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले असता त्यांनी सांगितले की, सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img