महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालायाने सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. हत्येच्या घटनेनंतर काय काय घडले त्याचा घटनाक्रम कसा होता हे जाणून घेऊया. (Narendra Dabholkar Murder case History To Court Verdict TimeLine)
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला घटनाक्रम
- 20 ऑगस्ट 2013 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून
- पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
- मे 2014 : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपासाची सूत्रे
- जून 2016 : सीबीआयकडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक.
- सप्टेंबर 2016 : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
- ऑगस्ट 2018 : महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.
- मे 2019 : व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआयकडून अटक; पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता.
- सप्टेंबर 2019: दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली.
- सप्टेंबर 2021 : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.
- 10 मे 2024 : पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत दाभोलकर हत्याप्रकणात न्यायालयाने सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली. यात विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
- जो निकाल आला आहे त्या निकालाचा आदर करतो, पण उर्वरीत आरोपींना निर्दोष सुनावण्यात आल्याने, आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊ, असं दाभोलकरांच्या वकिलांनी सांगितलं आहे.