9.5 C
New York

SSC HSC Result : ‘या’ तारखेला जाहीर होणार 10वी, 12वीचा निकाल ?

Published:

फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा (SSC HSC Result) पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करीअरच्या दृष्टीने दहावी आणि बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला आकार देण्याच्या दृष्टीने ही दोन वर्ष अत्यंत महत्त्वाची मानली जातात. महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा दिली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांच लक्ष निकालाकडे लागलं आहे. निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालक वर्गाचे डोळे लागले आहेत. याच निकाला संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी, 12वी च्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांना लागली आहे. रिपोर्ट्सनुसार यंदा MSBSHSE चे निकाल मे महिन्यातच लागणार आहेत. त्यामुळे आता निकालाच्या तारखेचे वेध विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील लागले आहे. बोर्डाकडून पहिल्यांदा मे महिन्याच्या मध्यावर 12वीचा आणि नंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. 10 वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण आवश्यक आहेत. बोर्डाचा निकाल हा बेस्ट ऑफ 5 धोरणावर लावला जातो.

11 वर्षांनी दाभोलकर प्रकरणी निकाल जाहीर, मात्र…

SSC HSC Result  कधी लागणार निकाल?

निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तारीख जाहीर होणार आहे. पुढच्या आठवड्यात बोर्डाचा निकाल जाहीर होणार. पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर केले जाणार. दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांची पसंतीच्या कॉलेजमध्ये, शाखेमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु होते. आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी टक्केवारी महत्त्वाची ठरते. म्हणून दहावी-बारावीचे विद्यार्थी वर्षभरत कसून मेहनत घेतात. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यात 8 लाख 21 हजार 450मुले आणि 6 लाख 92हजार 424 मुलींचा समावेश होता. दहावीच्या परीक्षेत जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले होते. यातील 3 लाख 64 हजार 314 विद्यार्थी मुंबईतील आहेत.

SSC HSC Result निकाल कसा पाहायचा?

  1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर भेट द्यावी.
  2. येथे विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे.
  3. पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.
  4. यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल.
  5. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img