23.1 C
New York

Unseasonal Rain : राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे

Published:

महाराष्ट्रात (Maharashtra Weather) पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राज्यात मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाने महाराष्ट्र पोळून निघाला (Weather Update) आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच दिलासा देणारी बातमी आली आहे. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. त्यानंतर राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Unseasonal Rain विदर्भातील तापमानात घट

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात काल अवकाळी पावसासह जोरदार गारपीटने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने होरपळणाऱ्या विदर्भातील तापमानात घट झाली. मात्र हा अवकाळी पाऊस शेतातील पिकांसाठी नुकसानदायक ठरणार आहे. काही ठिकाणी फळबागांचे नुकसानही झाले आहे. हा पाऊस शेती पिकांसाठी मात्र चांगलाच नुकसान करणारा ठरला आहे. यामुळे फळबागांसह शेतीचं नुकसान झालं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी अपडेट; १ हजार कोटींची गुंतवणूक

Unseasonal Rain मराठवाड्यात 12 मे पर्यंत पाऊस

विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भात मराठवाड्यात 12 मे पर्यंत पाऊस होईल. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img