राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या Mahayuti नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) टेन्शन वाढले असून, आता राज्यातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात कशा पद्धतीने मतदानाचा टक्का वाढवता येईल यावर खलबतं केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) 4 जूनपूर्वीच महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल काय लागेल हे आकडेवारीसह जाहीर करून टाकले आहे. राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज पवारांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या अंदाजामुळे राज्यात 45 प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. ते साताऱ्यात पत्रकाप परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसध्ये विलीन करण्याचं मी बोललेलो नाही असेही स्पष्टीकरण दिले आहे. (Sharad Pawar On Maharashtra Loksabha Election Result)
पवार म्हणाले की, देशासह राज्यात तीन टप्प्यात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी मोदींना अस्वस्थ करणारं दिसतंय. यावेळी पवारांनी पक्ष विलीन करणाऱ्या विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यातील काही प्रदेशिक पक्ष विलीन होतील पण सरसकट पक्ष विलीन होणार नसल्याचे सांगत शिवसेना पक्षाचं (ठाकरे गट) अस्तित्व स्वतंत्र्य असून, ठाकरे यांच्या पक्षाबाबत मी काहीही बोललेलो नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे, असं पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदी सांभाळणार मिशन मुंबईची कमान
Mahayuti राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसध्ये विलीन करण्याचं मी बोललेलो नाही
यावेळी पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष (पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, 2001 पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांची विचारधारा एकच, त्यामुळे आम्ही एकत्र काम करत असल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसध्ये विलीन करण्याचं मी बोललेलो नाही.
Mahayuti मला त्रास नाही; पवारांनी अजितदादांचा दावा खोडून काढला
यावेळी पवारांनी अजित पवारांनी पवार साहेबांना जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी गळ घातली जात आहे. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांना सभांच्या माध्यमातून त्रास दिला जात असून, त्यांना कोणीही आराम करा असं म्हणत नसल्याचे म्हटले होते. त्यावर पवारांनी हा दावा खोडून काढत ‘कोणीही मला त्रास दिलेला नाही. ते लोक माझ्यावर प्रेम करतात. प्रेमापोटी आम्ही काम करत आहोत.’ असे प्रत्युत्तर दिले आहे.